एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी १० जणांच्या टोळीला अटक; २५२ कोटीचा मुद्देमाल जप्त

फेब्रुवारी महिन्यांत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परवीनबानोला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे पोलिसांना ६४१ ग्रॅम वजनाचे एमडी आणि ड्रग्ज विक्रीतून आलेली १२ लाख २० हजार रुपयांची रोकड, दीड लाखांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल सापडला होता.
एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी १० जणांच्या टोळीला अटक; २५२ कोटीचा मुद्देमाल जप्त

मुंबई : एमडी ड्रग्ज तस्करीच्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश करून एका महिलेसह १० जणांना अटक केली आहे. या टोळीने सांगली येथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरू केला होता. परवीनबानो गुलाम शेख, साजिद मोहम्मद आसिफ शेख ऊर्फ डेबस, इजाजअली इमदादअली अन्सारी, आदित्य इम्तियाज बोहरा, प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद बाळासो मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी आणि लक्ष्मण बाळू शिंदे अशी या १० जणांची नावे असून ते सर्वजण मुंबई, सुरत आणि सांगलीचे रहिवाशी आहेत.

या कारवाईत पोलिसांनी २५२ कोटी २८ लाख रुपयांचे १२६ किलो १४१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, १५ लाख ८८ हजार रुपयांची कॅश, दिड लाखाचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची एक स्कोडा कार असा २५२ कोटी ५५ लाख ३८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यांत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परवीनबानोला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे पोलिसांना ६४१ ग्रॅम वजनाचे एमडी आणि ड्रग्ज विक्रीतून आलेली १२ लाख २० हजार रुपयांची रोकड, दीड लाखांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल सापडला होता. त्यानंतर या पथकाने मीरारोड येथून साजिद मोहम्मद शेख आणि सुरत येथून इजाअली अन्सारी आणि आदित्य बोहरा या दोघांना अटक केली होती. या तिघांकडून कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. त्यांच्या चौकशीतून सांगलीतील एका एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश झाला होता. त्यांनतर प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यात कारवाई केली होती. या कारखान्यातून २४५ कोटी रुपयांचा १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

विक्रीसाठी महिलांचा वापर

या कटाचा मुख्य सूत्रधार प्रवीण शिंदे जेलमध्ये असताना त्याची इतर आरोपींशी चांगली मैत्री झाली आणि त्यांनी पुन्हा एमडी ड्रग्स विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली होती. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगली येथे एक कारखाना सुरू केला होता. ही टोळी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी परवीनबानोचा वापर करत होती. महिलांवर शक्यतो कोणीही संशय घेत नसल्याने प्रत्येक डिलसाठी तिला पाठविले जात होते. त्यासाठी तिला चांगले कमिशन मिळत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in