सध्याचे सरकार फारच रडके! मनोज जरांगेंचा हल्लाबोल

सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस फारच हुशार व राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे दिसून येते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केली.
सध्याचे सरकार फारच रडके! मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Published on

जालना : सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस फारच हुशार व राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे दिसून येते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केली.

अंतरवाली सराटीत जरांगे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.

‘आम्ही गोरगरीब लोकांसाठी संघर्ष करत आहोत, तर काही ठिकाणी फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत. मात्र समाज हुशार आहे, तो सर्वकाही पाहत आहे. फडणवीस यांच्या जीवावर मस्ती करणाऱ्यांचे दिवस भरलेत. समाज त्यांचा हिशोब करील. राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि गेले, भाजपही संपेल. भाजप आमदार प्रसाद लाड थोड्याच दिवसात वेडे होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

महायुती सरकारने सगेसोयऱ्याची अधिसूचना काढली, पण तिची अंमलबजावणी केली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची ग्वाही देऊनही ते मागे घेतले नाहीत, बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना नोकऱ्या दिल्या नाहीत, शिंदे समितीला मुदतवाढ दिली असतानाही ही समिती काम करत नाही, मराठ्यांचे ‘ईडब्लूएस’ रद्द का केले? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी महायुती सरकारवर यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in