कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले

या प्रकरणी करण, विशाल्या, मुज्ज्या, शुभ्या नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले

पुणे : खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश पंडित गायकवाड याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी करण, विशाल्या, मुज्ज्या, शुभ्या नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय आहे. या कंपनीकडून घरपोहोच खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येतात. हडपसर भागातील रामटेकडी परिसरात एका ग्राहकाला खाद्यपदार्थ देण्यासाठी निलेश गेला होता.

logo
marathi.freepressjournal.in