दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

या संबंधी व्यापारी प्रसनजित प्रभुराम डोईफोडे यांनी पोलिसांत तक्रार दिली
दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

नांदेड : नांदेडमधील होळी भागात दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ४ हजारच्या रोकडसह ५ हजार ७५० रुपयांचे साहित्य पळवले. या संबंधी व्यापारी प्रसनजित प्रभुराम डोईफोडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. होळी येथील दत्त मंदिराची ९ रोजी दुपारी सव्वा तीन वाजता चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील ४ हजार रुपयांची रोकड व मंदिरातील ५ हजार ७५० रुपयांचे साहित्य असा एकूण ९ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

logo
marathi.freepressjournal.in