प्रचार गीतातील 'जय भवानी' वर निवडणूक आयोगाचा आक्षेप; ठाकरे गटाला पाठविली नोटीस

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचार गीतमधील दोन शब्दावर आक्षेप घेत त्यांना नोटीस बजावले आहे.
प्रचार गीतातील 'जय भवानी' वर निवडणूक आयोगाचा आक्षेप; ठाकरे गटाला पाठविली नोटीस

मुंबई : या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही बदलेले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी (१६ एप्रिल) प्रचार गीत लॉन्च केले होते. ठाकरे गटाच्या प्रचार गीतमधील दोन शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत त्यांना नोटीस बजावले.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचार गीतामध्ये 'हिंदू' आणि 'भवानी' हे दोन शब्द काढण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे. ठाकरे गटाच्या प्रचार गीताच्या बॅकग्राउंड म्यूजिकमध्ये 'जय भवानी, जय शिवाजी' हे वाजत आहे.

'जय भवानी' हा शब्द हिंदू देवीशी संबंधित असल्यामुळे ठाकरे गटाने ते हटवावे. यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे. या प्रचार गीताच्या लाँन्चवेळी उद्धव ठाकरेंनी मशालचे बटण दाबण्याचे आवाहन देखील केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in