मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. १२ सप्टेंबर रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमापाठोपाठ सीईटी कक्षाने आयुर्वेद, होमियोपॅथी व युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लँग्वेज पॅथोलॉजी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचेही वेळापत्रकही जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरावर उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील सीईटी कक्षाने संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबरपर्यंत रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पसंतीक्रम देता येईल. तर १२ सप्टेंबर रोजी चारही अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना १३ ते १८ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.