"या जगामध्ये आपल्या बापाशी बेईमानी करणारी पहिली अवलाद...", रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

रामदास कदम यांनी यावेळी अनंत गीते यांच्यावरही टीका केली. गीते यांनी ७ वेळा खासदारकी भोगली. ३-४ वेळा मंत्री झालात मग कोकणासाठी...
"या जगामध्ये आपल्या बापाशी बेईमानी करणारी पहिली अवलाद...", रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

"या जगामध्ये आपल्या बापाशी बेईमानी करणारी पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे", असा घणाघात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. कोकणात येऊन उद्धव ठाकरे काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा, उद्धव ठाकरेंजवळ काहीही शिल्लक नाही, असेही ते म्हणाले. आज रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये रामदास कदम यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते आनंद गीते यांच्यावर जोरदार टीका केली.

रामदास कदम यांनी यावेळी अनंत गीते यांच्यावरही टीका केली. गीते यांनी ७ वेळा खासदारकी भोगली. ३-४ वेळा मंत्री झालात मग कोकणासाठी काय केलं? असा सवाल कदम यांनी केला. पाऊस पडला की आळंबी उगवतात तसे निवडणुका आल्या की हा माणूस उगवतो असेही ते अनंत गीतेंना उद्देशून म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सभेला राणेंचा विरोध-

सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरेंची सभा आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपचा विरोध आहे. आमच्या नेत्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले तर उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. त्यांची सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा तर, राणेंचे होम ग्राउंड म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि राणेंच्या मतदारसंघात आज ठाकरेंचा दौरा असून ते केसरकर, राणेंवर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in