एमजीएम रुग्णालयात पार पडली मराठवाड्यातील पहिली शस्त्रक्रिया

पुढील दोन ते तीन दिवसात डॉक्टरांनी पेशंटचे सर्व ड्रेन लाईन्स काढल्या. आणि तिसऱ्या दिवशी रुग्णाला स्वतःच्या पायावर चालविण्यात डॉक्टरांना यश आले.
एमजीएम रुग्णालयात पार पडली मराठवाड्यातील पहिली शस्त्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम रुग्णालयात एका ५५ वर्षीय रुग्णावर मराठवाड्यातील पहिली ॲओर्टिक डी-ब्रांचिंग आणि एंडोव्हॅस्क्युलर ग्राफ्टिंग सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

एमजीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एक ५५ वर्षीय रुग्ण छाती आणि पाठ दुखीने त्रस्त होता. एमजीएम रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी रुग्णाने बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र, त्यांच्या आजारावर त्यांना योग्य ते उपचार मिळत नव्हते. अखेर, मुंबई - पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी उपचार घेण्याचे ठरविले तेंव्हा त्यांना लार्ज एरोटीक असल्याचे निदान लागले. याच्या उपचारासाठी त्यांना संबंधित रुग्णालयाने अमाप खर्च सांगितला! उपचार घेणे तर आवश्यक होते मात्र, अशा परिस्थितीत काय करायचे? हा रुग्णाच्या कुटुंबीयासमोर प्रश्न होता. या दरम्यान रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉ.पोले यांचा सल्ला घेतला. डॉ. पोले यांच्या सल्ल्यानुसार रुग्णावर छत्रपती संभाजीनगर येथे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

'लेस ब्लड लॉस' अशी शस्त्रक्रिया रुग्णावर यशस्वीपणे पार पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंटवर एंडोव्हॅस्क्युलर ट्रीटमेंट करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. डॉ. शिवाजी पोले यांनी खूप कठीण समजली जाणारी एन्डोवेस्क्युलर ट्रीटमेंट तब्बल दोन ते तीन तास करून आवर्तिक टाकला. प्रक्रिया पार पडल्यानंतर पेशंट स्टेबल होता. रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

पुढील दोन ते तीन दिवसात डॉक्टरांनी पेशंटचे सर्व ड्रेन लाईन्स काढल्या. आणि तिसऱ्या दिवशी रुग्णाला स्वतःच्या पायावर चालविण्यात डॉक्टरांना यश आले. अशाप्रकारे अत्यंत गुंतागुंतीच्या एकापाठोपाठ दोन मोठ्या शस्त्रक्रिया एमजीएम रुग्णलयात पार पडल्या. या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामध्ये एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. एच. आर. राघवन, डॉ. सौरभ रॉय, डॉ. बेलापूरकर, डॉ. शिवाजी पोले, डॉ. राहुल चौधरी, कार्डियाक, भुलतज्ञ डॉ. अजीता अनाचात्रे, डॉ. नागेश जम्भूरे, डॉ. प्रियंका आणि सर्व संबंधितांचे योगदान राहिलेले आहे. एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम यांनी सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले.

logo
marathi.freepressjournal.in