अजित पवारांवर अंत्यसंस्कारांना सुरुवात; अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लोटला जनसागर; बघा Live व्हिडिओ

Ajit Pawar Funeral Live : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड मोठा जनसागर लोटला असून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यविधींना सुरुवात झाली आहे. यावेळी, 'परत या, परत या, अजितदादा परत या' अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.
अजित पवारांवर अंत्यसंस्कारांना सुरुवात; अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लोटला जनसागर; बघा Live व्हिडिओ
अजित पवारांवर अंत्यसंस्कारांना सुरुवात; अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लोटला जनसागर; बघा Live व्हिडिओ छाया सौजन्य : पीटीआय (PTI)
Published on

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड मोठा जनसागर लोटला असून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यविधींना सुरुवात झाली आहे. यावेळी 'परत या, परत या, अजितदादा परत या', 'अजित पवार अमर रहे' अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.

दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ दाखल झाले आहे. बारामतीतील सर्वच रस्त्यांवर समर्थकांची खचाखच गर्दी झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. अजित पवार यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत खात्यावर, 'महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप' असे लिहून लाईव्ह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

बघा व्हिडिओ

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ते मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. मात्र, बारामती येथे सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनामुळे केवळ भाजप-नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारमध्येच पोकळी निर्माण झाली नाही, तर त्यांनी नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजितदादांच्या अकस्मात जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ‘दादा’माणूस गमावला असल्याच्या भावना अगदी सर्वसामान्य माणसापासून राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in