जव्हार मध्ये क्रेनच्या साह्याने बांधलेली हंडी हर हर महादेव पथकाने फोडली; सहा थरांची हंडी फोडण्यास तब्बल तीन तास अथक प्रयत्न

हर हर महादेव पथकाने आपले कौशल्य पणास लावून तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांतून ही हंडी फोडण्यात आली.
जव्हार मध्ये क्रेनच्या साह्याने बांधलेली हंडी हर हर महादेव पथकाने फोडली; सहा थरांची हंडी फोडण्यास तब्बल तीन तास अथक प्रयत्न
Published on

जव्हार: जव्हार शहरातील तारपा चौक येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्याची संधी मिळाल्याने तारपा चौक येथील युवक ,युवती आणि सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन यंदाच्या उत्साहाने आनंद द्विगुणित झाला, क्रेन च्या साहाय्याने बांधण्यात आलेली ही हंडी शतकातील अधिक उंचावर होती, हर हर महादेव पथकाने आपले कौशल्य पणास लावून तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांतून ही हंडी फोडण्यात आली.

शहरात तारपा चौक येथे गेली ५वर्षे पासून क्रेन च्या साहाय्याने मोठी दहीहंडी लावण्यात येते.ही हंडी फोडण्यासाठी शहरातील बजरंग बली गोविंदा पथकाने सलामी दिली,त्यानंतर दर्या सारंग गोविंदा पथक यांनी देखील सलामी दिली, सहा थरांची हंडी फोडण्यात हर हर महादेव या पथकास अखेर 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर यश आले,सलामी दिलेल्या प्रत्येक पथकास भेट म्हणून एक ट्रॉफी देखील देण्यात आली आहे.

शहरात गणेश रजपूत यांची दहीहंडी यशवंत नगर परिसरात,गांधी चौक ,अर्बन बँक आणि इतर अनेक ठिकाणी हंडी बांधण्यात आल्या ,बऱ्याच हंडी या गोपिकानी देखील फोडल्या आहेत.शहरात कृष्ण जन्म अतिशय उत्साहात साजरा झाला.

logo
marathi.freepressjournal.in