सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

या हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. यावेळी स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले आहे.
सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथे घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर आज (३ मे) सकाळी क्रॅश झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, सुषमा अंधारे महाडहून बारामतीमध्ये महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जाणार होत्या. अंधारे या हेलिपॅड येथे पोहोचल्या असता त्यांच्या समोरच हेलिकॉप्टर क्रॅश झाले. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सुषमा अंधारे यांना महाडहून घेण्यासाठी आज ९.३० वाजण्याच्या सुमारास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. पायलट हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना ते क्रॅश झाले. सुषमा अंधारे सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. यावेळी स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले.

नेमके काय झाले?

सुषम अंधारेंना घेण्यासाठी आज सकाळी हेलिकॉप्टर महाड येथील हेलिपॅडजवळ आले होते. परंतु, हेलिकॉप्टर लँडिंग करताना ते क्रॅश झाले. हेलिकॉप्टर लँड करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एका पायलटला दुखापत झाल्याचेही वृत्त आहे.

माझा पुढचा दौरा सुरूच राहणार- सुषमा अंधारे

हेलिकॉप्टर क्रॅशबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, महाडची सभा ही रात्रीची असल्यामुळे मी तिथेच थांबले होते. मी आज सकाळी एका प्रचारसभेसाठी जाणार होते. आज दिवसभरात माझ्या दोन-तीन सभा होत्या. मी सकाळी हेलिपॅडवर गेले असता हेलिकॉप्टर आकाशात फिरत होते. यानंतर ते अचानक क्रॅश झाले. यात आम्ही सुखरूप आहोत आणि माझा पुढचा दौरा सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रया त्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in