मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज,असे असेल गाड्यांचे वेळापत्रक

पावसाळी वेळापत्रकानुसार १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत धावणार
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज,असे असेल गाड्यांचे वेळापत्रक

दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण रेल्वेवर ११ जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू होणार आहे. मान्सूनसाठी कोकण रेल्वेनं पूर्ण तयारीही केली आहे. कोकण रेल्वेवर या मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत धावणार आहेत.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या या कोकण रेल्वे स्थानकावर एक ते दोन तास लवकर येणार आहेत. पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वेने हा बदल केला आहे.

सावंतवाडी स्थानकातून सुटणारी तुतारी एक्सप्रेस उद्यापासून सायंकाळी ५.५५ वाजता सुटणार आहे.सावंतवाडीहून दिव्याकडे जाणारी दिवा पॅसेंजर गाडी सावंतवाडी येथून सकाळी ८.२५ वाजता सुटेल.मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडीला सायंकाळी ६.३० वाजता येईल. तसेचमडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडीला दुपारी १.१८ वाजता पोहचेल.

मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी येथे सकाळी १०.०४ वाजता येईल. कणकवली स्थानकावर पहाटे येणारी मंगला एक्सप्रेस उद्यापासून पहाटे ५.०२ वाजता पोहचेल तर ओखा एक्सप्रेस दुपारी १.०२ वाजता दर शनिवारी आणि गुरूवारी थांबेल.

मंगळुरू एक्सप्रेस कणकवली स्थानकावर मध्यरात्री १२.०८ वाजता सुटणार आहे. कुडाळ स्थानकावर थांबणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस रात्री ८.५० वाजता सुटेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in