विरोधी पक्षनेता कोण अजून ठरले नाही - राहुल नार्वेकर; विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन गुंडाळणार?

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू झाले. अधिवेशन सुरू होण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांचे नाव पुढे करत विधानसभाध्यक्षांना ४ मार्च रोजी पत्र लिहिले.
विरोधी पक्षनेता कोण अजून ठरले नाही - राहुल नार्वेकर; विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन गुंडाळणार?
Published on

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू झाले. अधिवेशन सुरू होण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांचे नाव पुढे करत विधानसभाध्यक्षांना ४ मार्च रोजी पत्र लिहिले. मात्र अधिवेशन संपायला तीन दिवस शिल्लक असताना विरोधी पक्षनेता कोण हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेता कोण, यावर अद्याप निर्णय घेणे बाकी असून कोणाला विरोधी पक्षनेता करायचे हे ठरलेले नाही, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले. त्यामुळे यंदाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना संपणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र संख्याबळा अभावी मविआला विरोधी पक्षनेता पदावर दावा करणे ही शक्य झाले नाही. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने अधिवेशन काळात भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेता पदासाठी पुढे करत विधान सभा अध्यक्षांना पत्र लिहिले. ४ मार्च रोजी अध्यक्षांना पत्र लिहून ही अद्याप विरोधी पक्ष नेता कोण हे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यात २६ मार्च रोजी अधिवेशन संपणार असून विरोधी पक्ष नेता कोण ठरलले नाही.

logo
marathi.freepressjournal.in