उद्योजकांची यादी मंत्र्यांना देणार -जे. के. जाधव

रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीत उत्पादनास वाव असलेल्या जवळपास शंभर लहान-मोठ्या उद्योगांची यादी मंत्र्यांना देण्यात येणार आहे.
उद्योजकांची यादी मंत्र्यांना देणार -जे. के. जाधव

वैजापूर : तालुक्यातील रोटेगाव परिसरात सुरू होत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी स्थानिक उद्योजकांना एकत्रित करणार आहे. या इच्छुक उद्योजकांची यादी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व औद्योगिक विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती वैजापूर तालुका इंडस्ट्रीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. के. जाधव, सचिव मंगेश भागवत यांनी दिली.

रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीत उत्पादनास वाव असलेल्या जवळपास शंभर लहान-मोठ्या उद्योगांची यादी मंत्र्यांना देण्यात येणार आहे. यात अगदी नऊ लाखांपासून ३ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून आपले उद्योग सुरू करता येतील, असे डॉ. जाधव म्हणाले. यात कास्ट आय पाइप फिटिंग, कास्ट आयर्न फाऊं. प्लास्टिक कंटेनर, मोल्डेड लग ब्रिफकेस, पी.व्ही.सी. टाइल्स, मशी टूल्स, स्पोर्ट शूज, कलर टीव्ही, फ भाजीपाला प्रक्रिया, रोलर फ्लो मिल (रवा, मैदा तयार करणे) ऑटोमोबाइल रेडिएटर, दुचाब कार्बोरेटर, सिमेंट, पेंट यासारख उद्योगांचा समावेश आहे. वैजापूर येथे एमआयडीसी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९- मध्ये १ हजार १७० एकर जमी संपादित केली; मात्र, येथ एमआयडीसीचा प्रश्न अद्याप रखडल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे येथे उद्योग सुरू करण्यास इच्छुक उद्योजकांची यादी लवकरच उद्योग मंत्र्यांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in