प्रतिक्षा संपली! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल

महाराष्ट्र स्टेट बोर्डने 25 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.
प्रतिक्षा संपली! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल

दहावी आणि बारावी हे दोन शैक्षणिक वर्ष महत्वाची मानली जातात. तेथून करीयरच्या दिशा ठरत असतात. विद्यार्थी आणि पालकांना सध्या बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र, त्याची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. बारावीनंतर पुढे काय करायचे? यासाठी सर्वजण निकालाकडे लक्ष देऊन आहेत. बारावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे मानले जाते. फ्रेबुवारी मार्च महिन्यात या परिक्षा घेण्यात आल्या. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी या परिक्षांचा निकाल जाहीर केला जातो.

विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही विभागाचा निकाल पाहाता येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डने 25 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर केला जाणार आहे.विद्यार्थ्यांना एसएसएसद्वारे देखील हा निकाल पाहाता येणार आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

जर विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे निकाल पाहायचा असेल तर आपल्या मोबाईलच्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून तो 57766 या नंबरवर सेंड कारायचा त्यानंतर तुमच्या त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

ऑनलाई निकाल पाहण्यासाठी

विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तु्मचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून निकाल बघता येणार आहे. तसेच विद्यार्थ्याना त्याची PDF प्रिंट देखील काढता येणार आहे. निकाल घोषीत झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्र देखील दिले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in