१३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

या वाघाने वडसा येथे सहा जणांचा, तर भंडारामध्ये चार आणि ब्रह्मपुरी अभयारण्यात तीन जणांचा जीव घेतला आहे
१३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.

या वाघाने वडसा येथे सहा जणांचा, तर भंडारामध्ये चार आणि ब्रह्मपुरी अभयारण्यात तीन जणांचा जीव घेतला आहे. ‘सीटी-१’ या नरभक्षक वाघाने भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यामु‌ळेच नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. ताडोबा अभयारण्यातील विशेष पथक या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते; परंतु तीन महिन्यांपासून हा वाघ हुलकावणी देत होता. वडसा अभयारण्यात या वाघाची हालचाल दिसून आल्याने तसेच मानवी जीवाला धोका असल्याने या वाघाला पकडण्यासाठी खिंड लढवली जात होती. अखेर गुरुवारी सकाळी या वाघाला पकडण्यात यश आले आहे. ‘सीटी-१’ या वाघाने आतापर्यंत १३ लोकांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत होते. दोन दिवसांपूर्वी देसाईगंजजवळच्या एका गाईवर या वाघाने हल्ला केला. त्यामुळे तेथेच वनविभागाची टीम पाळत ठेवून होती. गुरुवारी सकाळी ताडोबा येथील टीमने या वाघाला जेरबंद केले. त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in