सामना रंगणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत उपस्थित राहणार

त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात घमासान पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.
सामना रंगणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत उपस्थित राहणार

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

आज सकाळी माध्यामांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील राजकीय स्थितीबाबतचा निकाल चाळीस दिवसांत लागणं अपेक्षित होते. त्यावर अद्याप काहीही झाले नाही. सहा महिन्यांपूर्वी सरकार बेकायदेशीर असल्याच न्यायालयाने सांगितलं होतं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत. त्याचा हिशोब सरकारला द्यावा लागले, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

एक पत्रकार म्हणून पत्रकार परिषदेला जाणार

संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोणासाठी खर्च केला याचं उत्तर त्यांना लागेल. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल, त्या बैठकीला एक पत्रकार म्हणून जाणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात घमासान पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in