आणीबाणीचा उल्लेख बिर्ला यांच्या पदाला साजेसा नाही - शरद पवार

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाषणामध्ये आणीबाणीचा उल्लेख केला तो उचित नव्हता, इतकेच नव्हे तर तो त्यांच्या पदाला साजेसाही नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
शरद पवार
शरद पवार

कोल्हापूर : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाषणामध्ये आणीबाणीचा उल्लेख केला तो उचित नव्हता, इतकेच नव्हे तर तो त्यांच्या पदाला साजेसाही नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या, त्या आम्ही काहीतरी भव्यदिव्य करीत आहोत, असा विधानसभा निवडणुकीपूर्वी देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला यांनी पहिल्यात भाषणामध्ये आणीबाणीचा उल्लेख केला होता तो बिर्ला यांच्या पदाला साजेसा नव्हता, ही ५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि आता इंदिरा गांधी हयात नाहीत, असे असताना बिर्ला यांनी हा मुद्दा का मांडला, राजकीय निवेदन करणे हे अध्यक्षांचे काम आहे का, असा सवाल पवार यांनी केला.

राज्य सरकारचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न

आपल्या खिशात केवळ ७० रुपये असताना आपण १०० रुपये कसे खर्च करणार? मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण काहीतरी भव्यदिव्य करीत असल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून सुरू आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in