Rain Alert : आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता - हवामान विभाग

राज्यात शनिवारी अक्कलकोटमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन गावात वाहतूक बंद करण्यात आली होती. तर तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरले होते.
Rain Alert : आज  मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता -  हवामान विभाग
Published on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक हे उन्हाच्या तडाख्याने हैराण असतानाच. ऐन उन्हाळ्यात राज्यातील सोलापूर, अक्कलकोट, पुणे, लातूर, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात शनिवारी (२१ एप्रिल) अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. या अवकाळी पाऊसामुळे नागरिकांसह बळीराजा हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतपीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच आज (२१ एप्रिल) राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. त्याचबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना आणि हिंगोली या भागात देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यात आहे. तसेच राज्यातील पुणे, सोलापूर, सांगली, धुळे, जळगाव, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पाऊसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान

राज्यात शनिवारी अक्कलकोटमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन गावात वाहतूक बंद करण्यात आली होती. तर तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरले होते. तसेच लातूरमध्ये गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. तर, कणकवणली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे आंबा आणि काजू पिकांवर परिणाम झाला आहे. या अवकाळी पाऊसामुळे राज्यातील काही भागात वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in