अवयवदानाची चळवळ अग्रेसर झाली पाहिजे -डॉ. लहाने

आज देशात प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या अवयवाची नितांत आवश्यकता आहे.
अवयवदानाची चळवळ अग्रेसर झाली पाहिजे -डॉ. लहाने

मुरूड-जंजिरा : भारतात ज्याप्रमाणे रक्तदान चळवळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे प्रत्येक रक्तपेढीमध्ये मुबलक रक्तसाठा आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाची चळवळ अग्रेसर होणे खूप आवश्यक आहे. आज देशात प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या अवयवाची नितांत आवश्यकता आहे. लोक वाट पहात असतात, परंतु अवयव मिळत नाही. मृत्यूनंतर अवयवदान केले, तर पुनर्जन्म मिळत नाही, ही एक अंधश्रद्धा लोकांच्या मनात बसली आहे. ती वेळीच दूर करून अवयवदानसुद्धा रक्तदान सारखा सामाजिक उपक्रम व्हावा, अशी अपेक्षा पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी बोलून दाखवली आहे.

मुरूड येथील एल.के.बी. रुग्णालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना मुरूड शहर शाखा, शिवसेना महिला आघाडी, युवा व युवती सिनेमार्फत भव्यदिव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद भायदे, बाळकृष्ण गोंजी, मुरूड शहर प्रमुख आदेश दांडेकर, नांदगाव सरपंच अल्पा घुमकर, जहूर कादरी, सजवनी डायलेसिस सेंटरचे अध्यक्ष विजय सुर्वे, डॉ. नेहा शेळके, अनुजा दांडेकर, विजय वाणी, सुहासिनी सुभेदार, राशिद फहीम, मुग्धा जोशी, नगमा खानजादा, महात्मा फुले सहकारी पतसंस्थाचे चेरमान अजित गुरव, प्रशांत कासेकर, रुपेश जामकर, कुणाल सतविडकर, अमित गोंजी, राहुल कासार, मुग्धा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in