महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली

रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in