एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हेंतर्फे ६० किलोंचा मोदक अर्पण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई येथे महाआरतीचे आयोजन

डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमोदनाना भानगिरे, रमेश कोंडे व पदाधिकारी यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दर्शन घेवून महाआरती केली.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हेंतर्फे ६० किलोंचा मोदक अर्पण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई येथे महाआरतीचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे ६० किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोऱ्हेंच्या व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या समवेत शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या नंतर डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमोदनाना भानगिरे, रमेश कोंडे व पदाधिकारी यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दर्शन घेवून महाआरती केली. या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे त्यांचे जास्तीत जास्त खासदार, आमदार निवडून यावेत व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होवो अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in