आले व्यापाऱ्याकडून कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार

पंढरीनाथ नारायण गायकवाड यांचे वाठार किरोली येथे कृषी सेवा केंद्र आहे
आले व्यापाऱ्याकडून कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार

कराड : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे एका आले व्यापाऱ्याने ‘मला आले देऊ नका, असे तू लोकांना का सांगतोय, माझे नुकसान करत आहेस, तुला जिवंत ठेवणार नाही,’असे म्हणत हातातील कोयत्याने तेथील एका कृषी सेवा केंद्र चालकावर त्या कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी उशिरा घडली. यात चालक जखमी झाला आहे, तर याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ नारायण गायकवाड (वय ४८) असे जखमी चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर श्रीकांत माळी (रा. शैला आर्वी,ता कोरेगाव) असे आले व्यापाऱ्यांचे नाव आहे.

पंढरीनाथ नारायण गायकवाड यांचे वाठार किरोली येथे कृषी सेवा केंद्र आहे. ते दुकानात बसले असता, शनिवारी सायंकाळी त्यावेळी श्रीकांत माळी हे आले व्यापारी हातात कोयता घेऊन दुकानात शिरला. त्याने ‘मला आले देऊ नका, असे तू आले उत्पादक शेतकरी लोकांना का सांगतोय, तू माझे नुकसान करत आहेस, तुला जिवंत ठेवणार नाही,’ असे म्हणत हातातील कोयत्याने गायकवाड यांच्या डोक्यात वार केला, यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.यावेळी गायकवाड यांनी बचावात्मक पवित्रा घेतला व आणखी होणारे वार परतवले त्यामुळे ते वाचले. दरम्यान, हल्ल्याचा हा प्रकार सुरू असताना उडालेल्या गोंधळामुळे शेजारील दुकानदार अनिकेतन जाधव व गणेश चव्हाण यांनी त्यांच्या दुकानात धाव घेतली.

logo
marathi.freepressjournal.in