बोनस दिला नाही म्हणून मालकाची हत्या

शनिवारी रात्री राजू ढेंगरे हे झोपायला गेले असताना छोटूने त्यांचा गळा आवळला. यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले
बोनस दिला नाही म्हणून मालकाची हत्या

नागपूर : दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून कामगारांनी ढाबामालकाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली. कामगारांनी प्रथम बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी धारदार शस्त्राने मालकावर वार केले. या घटनेत ढाबामालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या ढाबामालकाचे नाव राजू ढेंगरे असे आहे. छोटू आणि आदी हे राजू ढेंगरे यांच्या धाब्यावर कामाला होते. राजू ढेंगरे यांनी छोटू आणि आदी या दोघांना दिवाळीचा बोनस देणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी या दोघांना दिवाळीच्या बोनसमधील थोडी रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगितले.

शनिवारी रात्री राजू ढेंगरे हे झोपायला गेले असताना छोटूने त्यांचा गळा आवळला. यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. या घटनेत राजू ढेंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर छोटू आणि आदी हे दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in