प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकारांची उपस्थिती

देसाई यांच्या स्टुडिओत काम करणारे अनेक कर्मचारी देखील या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकारांची उपस्थिती

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बुधवारी एनडी त्यांच्या स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांचा आज पार्थिवावर एनडी स्टुडिओच्या परिसरात अंत्यसंस्कार केले केले. स्टुडिओमधील ६ व्या क्रमांकाच्या ग्राऊंडवर हे अंत्यसंस्कार केले गेले. दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर बरेच जण त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहचल्याचं दिसून आलं. देसाई यांची मुले परदेशातून आली आहेत. देसाई यांच्या स्टुडिओत काम करणारे अनेक कर्मचारी या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार तसंच त्यांचे नातेवाईक कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये दाखल आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारला बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. यात अभिनेता अमीर खान याने देखील नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली. त्याचबरोबर दिग्दर्शक आशुतोष गोवरीकर,दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी देखील नितीन देसाईंच्या अंतिम संस्कारासाठी हजेरी लावली. तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे आणि मानसी नाईक यांनी देखील नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शन घेतलं. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील लोकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in