राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या, आघाडी सरकारला न्यायालयाचा दणका

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता
राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या, आघाडी सरकारला न्यायालयाचा दणका
File Photo

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे दोन महत्वाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी केलेल्या अर्जावर, मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांचा अर्ज फेटाळला आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अशाप्रकारे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही. यामुळे राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या यामध्ये तिळमात्र शंका नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in