शेवटच्या व्यक्तीच्या विकासातूनच देशाची प्रगती होणार - यशवर्धन कुमार सिन्हा

यूपीएससी स्पर्धा परीक्षा २०२०-२१ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा १३वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ्यांच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
शेवटच्या व्यक्तीच्या विकासातूनच देशाची प्रगती होणार - यशवर्धन कुमार सिन्हा

संपूर्ण जग हे जागतिक खेडे बनले आहे. अशावेळेस मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे. ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रशासकीय सेवेत खूप काही करण्यासारखे आहे. समाजातील शेवट्या व्यक्तीचा विकास कसा होईल हे ध्यानात ठेऊनच कार्य करावे.”असे मत आयएफएस (सेवा निवृत्त) भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा २०२०-२१ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा १३वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ्यांच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

राज्यसभेचे माजी महासचिव व राज्यसभा सचिवालयाचे सल्लागार डॉ. पी. पी.के. रामचार्युलू, (निवृत्त आयपीएस), भारताच्या गृहमंत्रालयाच्या नॅशनल क्राईम ब्युरोचे संचालक रामफाल पवार व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माजी अध्यक्ष व प्रख्यात वकील श्रीमती मंजुला दास हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडे, स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. शालिनी शर्मा, स्कूल ऑफ सस्टेनेबल स्टडिजच्या संचालिका प्रा.अनामिका बिश्वास, डॉ. के. गिरीसन आणि डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.

या सोहळ्यात देशातून तिसरी आलेली गामिनी सिंगला ५१ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याच बरोबर ५५ यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. प्रा.डॉ. शालिनी शर्मा यांनी प्रास्ताविक केले. डॉ.आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in