औरंगाबादचे नामांतर हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही ; राजेश टोपे

औरंगाबादचे नामांतर हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही ; राजेश टोपे
Published on

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचे नामांतर हा आमच्या सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही असे म्हटल्याने पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथे माध्यमांनी सध्या सुरू असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या वादावार प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही,’

logo
marathi.freepressjournal.in