समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुचं! ट्रकची कढड्याला धडक ; दोघांचा जागीच मृत्यू

३० जून रोजी या महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलच्या झालेल्या अपघातात २५ ते २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुचं! ट्रकची कढड्याला धडक ; दोघांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्ग हा जणू मृत्यूचा सापळाच झाला आहे. काही केल्या या महामार्गावरील अपघातांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. हा महामार्गाचे टप्पे वाहतूकीला खुळे झाल्यापासून आतापर्यंत शेकडो जणांनी आपलं प्राण गमावले आहेत. तर काहींना आयुष्यभराचं अपंगत्व आलं आहे. राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या उपाययोजनांनंतर देखील अपघातांचं प्रमाण जैसै थे आहे. ३० जून रोजी या महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलच्या झालेल्या अपघातात २५ ते २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आता या महामार्गावर झालेल्या आणखी एका भीषण अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रात्री एक वाजेच्या सुमारास एका ट्रकचा भीषण असा अपघात झाला. या अपघात दोन जणांचा जागीचं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रक चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तळेगाव दशासर पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे. हा ट्रक नागपूरहून मुंबईच्या दिशेने येत असताना ट्रक चालकाला झोप लागली. यावेळी ट्रक पुलाच्या कठड्याला जाऊन आदळला. यामुळे हा अपघात झाला.

अपघात झाली ती वेळ रात्री एक वाजेची असल्याने ट्रक चालकाला डुलकी आली. यावेळी त्याचं ट्रकवरुन नियंत्रण सुटून ट्रक पुलावरील सिमेंटच्या कठड्याला धडकला. हा ट्रक प्रचंड वेगाने असल्याने ही धडक अतिशय जोरदार होती. यात ट्रकच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. या अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in