जळगावचे नाराज भाजप खासदार उन्मेष पाटील आज ठाकरे गटात

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून सात लाखांवर विक्रमी मते मिळवून निवडून आले होते. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्या दहा खासदारांत त्यांची गणना झाली होती.
जळगावचे नाराज भाजप खासदार उन्मेष पाटील आज ठाकरे गटात

विजय पाठक/ जळगाव

जिल्ह्यातील भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणातून लोकसभेचे तिकीट नाकारल्याने नाराज असलेले विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपला जळगाव मतदारसंघात यशासाठी झगडावे लागणार आहे. मुंबईत ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ‘नवशक्ति’शी बोलताना खा. पाटील यांनी ही माहिती दिली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून सात लाखांवर विक्रमी मते मिळवून निवडून आले होते. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्या दहा खासदारांत त्यांची गणना झाली होती. उच्चशिक्षित असलेले उन्मेष पाटील हे जिल्हयाचे अनेक प्रलंबित प्रश्न लोकसभेत मांडून ते सोडवण्यात यशस्वी झाले होते. त्यांच्या कामावर मतदार जरी खूश असले तरी लवकरच आपल्याला वरचढ ठरतील या भीतीने जिल्ह्यात भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू होऊन त्यात उन्मेष पाटलांचे तिकीट कापण्यात जिल्ह्यातील नेते यशस्वी झाले.

जळगाव मतदारसंघातून भाजपने उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट दिले. यामुळे भाजपचा एक मोठा गट नाराज झाला. उन्मेष पाटील यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे खा. पाटील यांचे समर्थक नाराज झाले.

logo
marathi.freepressjournal.in