इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती

प्रशासनाकडून दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना 8108195554 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात येत आहे
इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती
Published on

राजगड्या खालापूरत तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावार दरड कोसळली आहे. २०० ते २५० लोकसंख्या असेलेल्या या गावावर रात्री ११ वाजेच्या सुमारास डोंगराचा कडा कोसळला. यात सात जणांचा मृत्य झाला असून १७१ लोक दबले गेल्याची माहिती सांगितली जात आहे. प्रशासनाकडून दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना 8108195554 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकार इर्शाळवाडीतील लोकांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दु :खात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.

ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. असं ट्विट देवेंद्र फढणवीस यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून राजगडमधील इर्ळालवाडी गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आमि मदतकार्यचं सांनियंत्रण करत आहेत. लवकरात लवकर मदत पोहोचावी यासाठी अजित पवार हे आसपासच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बातचित करत आहेत.

इर्शाळवाडीबाबत माहिती मिळताच रायगडचे खासदार सुनील तटकरे तातडीने राजगडकडे रवाना झाले आहेत. संसदेच अधिवेशन सोडून तटकरे रायगडकडे रवाना झाले आहेत. लागले ती मदत केली जाईल, मी रात्रीपासून घटनेचा आढावा घेत आहे, असं सुनील तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in