राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणार

राज्याच्या तिजोरीवर 10,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली
राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणार
ANI
Published on

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा एक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार... राज्य सरकारने आता पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 10,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर व्हॅट कमी करण्याची मागणी त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपने राज्य सरकारकडे केली होती. मात्र, राज्यात सत्तेवर असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला होता त्याऐवजी, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढलेले कर कमी करावेत, अशी मागणी केली त्यावेळेस आघाडी सरकारकडून करण्यात येत होती.

logo
marathi.freepressjournal.in