वाऱ्याने पुतळा पडला हे विधान म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अकलेचे दिवाळे! भास्कर जाधव यांचा हल्लाबोल

मालवण राजकोट किल्यावर ताशी ४५ कि.मी. वेगाने वारे आले आणि त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला असे मुख्यमंत्र्यांनी बोलणे म्हणजे त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
वाऱ्याने पुतळा पडला हे विधान म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अकलेचे दिवाळे! भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
Published on

कुडाळ : मालवण राजकोट किल्यावर ताशी ४५ कि.मी. वेगाने वारे आले आणि त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला असे मुख्यमंत्र्यांनी बोलणे म्हणजे त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

जाधव सोमवारी कोर्टाच्या कामानिमित्ताने कुडाळला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकोट पुतळा प्रकरण व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले विधान यावर प्रतिक्रिया दिली.

गेटवे ऑफ इंडियाला पुतळा नाही का? गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा नाही का? प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही का? कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही का? कुठे पुतळा नाहीत ते सांगा? असे सवाल करीत ताशी १२० कि.मी.वेगाने वारे वाहून सुद्धा ते पुतळे हलले नाहीत असे जाधव म्हणाले.

या पुतळ्याशी महाराष्ट्र सरकारचा काही संबंध नाही, तर पुतळ्याच्या आजुबाजूला सुशोभीकरणासाठी २ कोटी ४० लाख रूपये महाराष्ट्र सरकारने का खर्च केले? महाराष्ट्रातल्या माणसाला पुतळा बनविण्यासाठी २ कोटी ५० लाख रूपये का दिले? ज्याला दिले त्याची पात्रता तपासली होती का?, त्याचा अनुभव बघितला होता का? तो कुणाच्या जवळचा होता? प्रत्येक गोष्टीत भ्रष्ट्राचार करायचा आणि महाराजांचं नाव घ्यायचं अशा शब्दांत जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in