राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, सुधारित पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्र्यांची संघटनांना ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत पेन्शनसंदर्भात दिलेल्या आश्वासनाला आणि संप न करण्याच्या आवाहनाला मान देत अधिकारी - कर्मचाऱ्यांचे २९ आॕगस्टपासूनचे बेमुदत संप आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, सुधारित पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्र्यांची संघटनांना ग्वाही
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत पेन्शनसंदर्भात दिलेल्या आश्वासनाला आणि संप न करण्याच्या आवाहनाला मान देत अधिकारी - कर्मचाऱ्यांचे २९ आॕगस्टपासूनचे बेमुदत संप आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी २९ आॕगस्ट २०२४ पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन पुकारले होते. संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजपत्रित अधिकारी महासंघ तसेच कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे मंगळवारी झाली.

याबाबतची माहिती संघटनेचे ग.दि.कुलथे (मुख्य सल्लागार), विनोद देसाई (अध्यक्ष), समीर भाटकर (सरचिटणीस), नितीन काळे (कोषाध्यक्ष), सिद्धी संकपाळ (अध्यक्षा, दुर्गा महिला मंच) यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च २०२४ रोजी आश्वासित केलेप्रमाणे राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील बैठकीत अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिली.

logo
marathi.freepressjournal.in