नीट पीजी परीक्षा २०२२’ पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नीट पीजी परीक्षा २०२२’ पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

‘नीट पीजी परीक्षा २०२२’ पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ‘परीक्षा आयोजित करण्यास होणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांची संख्या कमी होईल,’ असे मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केले.

ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटाने केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होते. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांकडून आंदोलनही करण्यात येत आहे. २१ मे २०२२ ला नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली होती. कौन्सिलिंगच्या दरम्यान ही परीक्षा येत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, परीक्षा पुढे ढकलल्याने ‘अराजकता आणि अनिश्चितता’ निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल

Related Stories

No stories found.