माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा! पुढील सुनावणीपर्यंत आत्मसमर्पणाची गरज नाही

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा! पुढील सुनावणीपर्यंत आत्मसमर्पणाची गरज नाही

मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या १९ मार्चच्या या निकालाविरुद्ध प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले होते.
Published on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. २००६ च्या बनावट चकमक प्रकरणात झालेली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पुढील आदेश येईपर्यंत आत्मसमर्पण करण्याची गरज नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सोमवारी म्हटले आहे. या प्रकरणातील त्यांच्या जामीन याचिकेवर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.

मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या १९ मार्चच्या या निकालाविरुद्ध प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले होते. या अपिलावरील सुनावणीत न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या न्यायपीठाने संबंधितांना नोटीस जारी केली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत त्यांना आत्मसमर्पण करण्याची गरज नाही, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

२००६ मध्ये गुंड छोटा राजनचा कथित निकटवर्तीय रामनारायण गुप्ता याची बनावट चकमकीत हत्या करण्यात आल्याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

logo
marathi.freepressjournal.in