
भाजपसोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये सत्ता स्थापन केली, यानंतर राज्यामध्ये सत्ता संघर्षांचा पेच निर्माण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सत्ता संघर्ष प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली असून केवळ निकालाची प्रतीक्षा होती. गेल्या दोन दिवसांपासून याप्रकरणी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी निकाल उद्या जाहीर होणार असल्याचे जाहीर केले.