दुचाकीवरील दोघांनी शिक्षकाला लुटले

२० हजार रूपयाचा माल जबरीने चोरून घेतला
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

नांदेड : बंदुक काढून दाखवु का?, अशी धमकी देत दुचाकीवरील दोघांनी एका शिक्षकाला लुटल्याची घटना किनवट येथे घडली आहे. यासंबंधी किनवटमधील समतानगर येथील शिक्षक चंद्रशेख विठ्ठलराव शेंडे यांनी पोलीसात तक्रार दिली. शेंडे व त्यांचे मित्र हे २१ ऑगस्ट रोजी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचे बांधकाम बघण्यासाठी गंगाबोडी रोड गोकुंदा येथे मोटार सायकलवर जात होते. यातील दोन मोटार सायकलवरील आरोपीतानी संगणमत करून मोटार सायकल आडवी लावुन शेंडे व त्यांच्या मित्राच्या खिशातील नगदी पाच हजार रूपये व १५ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकुण २० हजार रूपयाचा माल जबरीने चोरून घेतला व तुम्हाला बंदुक काढुन दाखवु का अशी धमकी दिली. याप्रकरणी शिक्षक चंद्रशेख विठ्ठलराव शेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in