राज्यसभेच्या 56 सदस्यांचा कार्यकाळ संपणार! महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश; 'या' तारखेला होणार निवडणूक

यावर्षी राज्यसभेच्या 68 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे, त्यात 9 केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे.
राज्यसभेच्या 56 सदस्यांचा कार्यकाळ संपणार! महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश; 'या' तारखेला होणार निवडणूक

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या रिक्त होणाऱ्या 56 जागांपैकी 6 जागा महाराष्ट्रातील आहेत. देशातील 15 राज्यांतील या 56 जागा असून 27 फेब्रुवारी रोजी यासाठीची मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. आज (सोमवारी) निवडणूक आयोगाने यासंदर्भातील घोषणा केली आहे.

2 एप्रिल रोजी 13 राज्यांतील 50 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर दोन राज्यातील 6 सदस्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपणार आहे. तसेच, यावर्षी राज्यसभेच्या 68 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे, त्यात 9 केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये त्यासाठी आतापासूनच चढाओढ सुरु झाली आहे.

रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागांमध्ये 'या' 15 राज्यांचा समावेश-

  • महाराष्ट्र

  • उत्तर प्रदेश

  • बिहार

  • पश्चिम बंगाल

  • मध्य प्रदेश

  • गुजरात

  • आंध्र प्रदेश

  • तेलंगणा

  • राजस्थान

  • कर्नाटक

  • उत्तराखंड

  • छत्तीसगड

  • ओडिशा

  • हरयाणा

  • हिमाचल प्रदेश

महाराष्ट्रातील 'या' सहा खासदारांचा कार्यकाळ संपणार

  • कुमार केतकर (काँग्रेस)

  • वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

  • प्रकाश जावडेकर (भाजप)

  • मुरलीधरन (भाजप)

  • नारायण राणे(भाजप)

  • अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

दरम्यान, कार्यकाळ संपणाऱ्या महाराष्ट्राच्या सहा खासदारांमध्ये प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे या दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in