10 वर्षाच्या प्रेमाचा भयानक अंत; संशयातून OYO मध्येच झाडल्या प्रेयसीवर गोळ्या, पुण्याच्या हिंजवडी येथील घटना

10 वर्षाच्या प्रेमाचा भयानक अंत; संशयातून OYO मध्येच झाडल्या प्रेयसीवर गोळ्या, पुण्याच्या हिंजवडी येथील घटना

दोघेही उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी असून मागील 10 वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. या दोघांचे घरही एकाच परिसरात होते. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये...

राज्यासह देशात प्रेमसंबंधातून हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी पुण्याच्या हिंजवडी परिसरात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात एका इंजिनियर तरुणीची OYO च्या एका हॉटेलमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे ही हत्या तिच्या प्रियकराने केली आहे. दोघांच्या नात्यामध्ये संशय निर्माण झाल्याने नात्याचा असा भयानक शेवट झाला.

वंदना द्विदेदी असे हत्या झालेल्या मुलीचे तर ऋषभ राजेश निगम असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. दोघेही उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी असून मागील 10 वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. या दोघांचे घरही एकाच परिसरात होते. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये संशयाने जागा घेतल्याने प्रियकराने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

25 जानेवारी रोजी ऋषभ हा वंदनाला पुण्यात भेटायला आला होता. त्याने लक्ष्मी चौक येथे OYO वर रुम बुक केली होती. दोन्हीही दोन दिवसांपासून तिथेच होते. रविवारी काही कारणावरु त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने ऋषभने वंदनावर पाच गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ऋषभ त्याठिकाणाहून पसार झाला. तो OYO मधून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ऋषभकडे बंदूक आली कुठून? त्या दोघांमध्ये काय वाद झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. याच बरोबर ऋषभने वंदनावर गोळ्या झाडल्यानंतर आवाज का झाला नाही? याबाबतही आश्चर्च व्यक्त केले जात आहे.

आरोपीच्या मुसक्या आवळल्या-

प्रेयसीवर गोळ्या झाडून ऋषभ पसार झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांना घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी ते दोघे राहत असलेल्या रुमची मास्टर चावी घेऊन कुलूप उघडले असता त्यांना आत वंदनाचा मृतदेह दिसला. यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत मुंबई पोलिसांशी संपर्क करत ऋषभबद्दल माहिती दिली. मुंबई पोलिासांनी ऋषभच्या मुसक्या आवळल्या असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. ऋषभला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in