तेरसे शिमगाेत्सवाला सुरुवात

संगमेश्वर तालुक्यातील कर्जुवे गावच्या तेरसे शिमगोत्सवाला स्थानिक ग्रामस्थांसह मुंबई पुणे कोल्हापूर कडून आलेल्या चाकरमान्यांच्या उपस्थित शोमगोत्सव जल्लोषात पार पडत आहे.
तेरसे शिमगाेत्सवाला सुरुवात

सुनील नलावडे/रत्नागिरी : कोकणतील विविध अंगी पद्धतीने प्रचलित प्रथा परंपरा विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी युक्त अशा होलिको उत्सवाला ढोलताशा व फाकानमध्ये सुरवात झाली असून शुक्रवारी तेरसे शिमगोत्सवातील होळीचे होम लागले तेरसे शिमगोत्सव सायंकाळी उशिरा पर्यंत धुमधडाक्यात संप्पन करण्यात येत होते

संगमेश्वर तालुक्यातील कर्जुवे गावच्या तेरसे शिमगोत्सवाला स्थानिक ग्रामस्थांसह मुंबई पुणे कोल्हापूर कडून आलेल्या चाकरमान्यांच्या उपस्थित शोमगोत्सव जल्लोषात पार पडत आहे. करजुवे येथील होळीचा होम दुपारी २ च्या सुमारास लागला होमापुर्वी समस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ करजुवे वासीय मानकरी , गुरव, डावल आदी. मानकऱ्यांच्या उपस्थितीत मध्यरात्री होळीचा माड डोंगर दरीच्या भागातून मोठ्या संख्येने होळीच्या खुटावर आणला गेला व पहाटेच्या वेळी होळीचा माड उभा झाला. त्यानंतर श्री देव तळेकरणीच्या सहाणेवर विराजमान असलेल्या पालखीची पूजाअर्चा होऊन गुरव मानकऱ्यांच्या हस्ते सहाणे समोरील होळी देवाची पूजा अर्चा करून मंगलाष्टके झाल्या नंतर साहानेच्या समोरील पहाटे उभ्या केलेल्या माडाखाली वाजतगाजत होळी देवाला आणण्यात आले त्याचवेळी तळेकरीण देवीचे पुजाऱ्यांकडून, गुरवांकडून सहवाद्य मिरवणुकीने आल्यावर खुंटावर पुन्हा रीती रिवाज नुसार मंगलाष्टके होऊन होळीचा होम पेटवण्यात आला या होमात नवदांपत्यासह मानकर्यांनी मानपान जप्त होममध्ये नारळ अर्पण केले होमात नारळ टाकण्याच्या या परंपरेला या शिमगोत्सवात अत्यंत महत्व आहे.

होमातील नारळ टाकण्याच्या परंपरे नंतर श्री देवी तळेकरीण देवीची पालखी सहाणेवरून उठली व समस्थ मानकार्यांसग ढोल ताशे साने च्या वजनतरी मध्ये माड व पेटत्या होळीला पालखीसह प्रदक्षिणा घातल्या नंतर होळीच्या कुटावरच दूरवरून आलेल्या माहेर वासिनींनी सोबत आलेल्या चाकर मान्यानी गाराण्यांसह नवस फेडले व केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in