पार्टीवरून 'ट्रिपल सीट' परतताना तीन मित्रांचा करुण अंत; सोलापूरातील हृदयद्रावक घटना

हा अपघात इतका भीषण होता की हे तिन्ही मित्र वेगवेगळ्या दिशेला फेकले गेले. त्यांना जबर मार लागला. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना...
पार्टीवरून 'ट्रिपल सीट' परतताना तीन मित्रांचा करुण अंत; सोलापूरातील हृदयद्रावक घटना
Published on

सोलापूरात दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणारे तीन मित्र जीवाला मुकले. शहरातील महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दुचाकी झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. इरण्णा मठपती, निखिल कोळी, दिग्विजय सोमवंशी अशी मृत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही तरुण पार्टी करुन येत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. निखिल कोळी या तरुणांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. रविवारी त्याने एका कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था करुन दिल्याने त्याला त्या कार्यक्रमाचे भाडे आले होते. यानंतर त्याने इरण्णा आणि दिग्विजय या दोघांना पार्टीसाठी बाहेर नेले. त्यांनी एका हॉटेलमध्ये पार्टी केली. पार्टीनंतर पल्सर या दुचाकीवरून परतत असताना महावीर चौकात दुचाकी झाडाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की हे तिन्ही मित्र वेगवेगळ्या दिशेला फेकले गेले. त्यांना जबर मार लागला. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली पोलिसांनी त्यांना तात्काळ सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी या तिन्ही तरुणांना तपासून मृत घोषित केले.

या अपघातात मृत झालेले तिन्ही तरुण एकाच गावातील होते. त्यांच्यापैकी निखील आणि इरण्णा हे घरात एकुलते एक होते. इरण्णा हा दुचाकीच्या शोरुमधघ्ये नोकरीला होता. तर दिग्विजय सोमवंशी याचा सलूनचा व्यवसाय होता. या तिन्ही तरुणांवर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शासकीय रुग्णयाबाहेर त्यांच्या नातेवाईकांना मोठी गर्दी केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in