मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट घुसले शेतात

मालगाडी थेट शेतात घुसून मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली.
 मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट घुसले शेतात

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा रविवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास अपघात झाला. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसले. सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. मालगाडी थेट शेतात घुसून मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. रेल्वेचे इंजिन कोसळून इतर डबेही रुळावरून घसरल्यान मालगाडीचे मोठे नुकसान झाले. मध्य रेल्वेच्या सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात झाला. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला? याचा सद्य:स्थितीत तपास सुरू असून अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरून घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सकाळपासून युद्धपातळीवर सुरू होते. या काळात अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, दुर्घटनेचा तपास सुरू असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in