खंजरचा धाक दाखवत दुचाकी पळवली

ही घटना कामठा ते मालेगाव रस्त्यावरील सावरगाव फाट्याजवळ घडली
खंजरचा धाक दाखवत दुचाकी पळवली

नांदेड : दुचाकीवरील दोघांनी एका जेसीबीचालकाला अडवून खंजरचा धाक दाखवत रोखरकमेसह त्यांची दुचाकी पळवली. ही घटना कामठा ते मालेगाव रस्त्यावरील सावरगाव फाट्याजवळ घडली. आकाश लक्ष्मण वाघमारे यांनी यासंबंधी पोलीसात तक्रार दिली.

जेसीबीचालक आकाश वाघमारे हे ८ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या मित्रासह दुचाकी क्रमांक (एमएच २६ वाययु ८२६२) वरून कामठा ते मालेगाव रस्त्यावरून अर्धापूरकडे जात होते. सावरगाव फाट्याजवळ चोरट्यांनी अडवून त्यांच्या सोबतच्या मित्रास खंजरचा धाक दाखवून वाघमारे यांच्याजवळील नगदी दोन हजार रुपये व मोटारसायकल असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in