महाराष्ट्रातील सर्वात मोठा सत्तासंघर्षाचा निकाल आज ; महाराष्ट्रात सरकार कायम राहणार ; एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, सर्व माहिती फक्त एका क्लिक वर

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सत्तासंघर्षाचा निकाल आज ; महाराष्ट्रात सरकार कायम राहणार ; एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, सर्व माहिती फक्त एका क्लिक वर

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रीम कोर्टात

सरकार हे घटनाबाह्यच - संजय राऊत 

१६ आमदारांचा निर्णय नार्वेकरांकडे ; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारबाबत मोठा निर्णय सादर केला 

महाराष्ट्रात सरकार कायम राहणार ; एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा 

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले असते  

राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट 

एकनाथ शिंदे गटाला पहिलाच मोठा झटका

भरत गोगावले यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह ; नियुक्ती बेकायदेशीर 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात ; ७ न्यायमूर्तींचं घटनापीठ 

दिल्लीच्या निर्णयामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका ; दिल्लीतल्या सेवा दिल्ली राज्य सरकारच्या अधीन राहणार 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने पत्रकार परिषद घेणार

सर्वोच्च न्यायालय निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबईत काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला 

या सगळ्यात माझी भूमिका संपली आहे. माझ्या भूमिकेवर न्यायालय काय म्हणेल यावर आपण बोलू - भगतसिंग कोश्यारी

११.३० वाजता घटनापीठ बसणार ; त्यानंतर निकालावाचन होणार 

नरहरी झिरवळ नाशिकमध्ये

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याची चर्चा चालू असताना ते नाशिकमध्ये असल्याचे समोर आले,  त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी निकालावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

तोपर्यंत सरकार धोक्यात आहे, असे म्हणण्यात अर्थ नाही

लोकशाहीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला मिळालेल्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत आहेत. जोपर्यंत त्यांना 145 आमदारांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत सरकार धोक्यात आहे, असे म्हणण्यात अर्थ नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी केले 

नरहरी झिरवळ यांचा मोबाईल बंद

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात येत असून निकाल अवघ्या काही तासांवर असताना झिरवळ यांची नेमकी भूमिका काय ? अशी चर्चा सुरु 

कोणत्या १६ आमदारांवर होणार निर्णय

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे

महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अवघ्या काही तासांत, त्याचबरोबर १६ आमदारांच्या अपात्रतेचा फैसला देखील आजच होणार आहे. दोन्ही गटांमध्ये कमालीचा तणाव असल्याचे बोलले जात आहे. 
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज अकरा वाजता सुप्रीम कोर्टात सुनावण्यात येणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

logo
marathi.freepressjournal.in