मुख्यमंत्री सुपुत्र श्रीकांत शिंदेच्या व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले झटपट निर्णय आणि झंझावाती दौरे यासाठी चर्चेमध्ये असताना त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो
मुख्यमंत्री सुपुत्र श्रीकांत शिंदेच्या व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले झटपट निर्णय आणि झंझावाती दौरे यासाठी चर्चेमध्ये असताना त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो विरोधकांनी व्हायरल केला आहे. या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री खुर्चीवर बसून कार्यकर्त्यांशी बोलताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत चिरंजीव मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार पाहत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे रविकांत वर्पे यांनी केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही श्रीकांत शिंदे यांचे फोटो शेअर करून गंभीर आरोप केला आहे. मेहबूब शेख यांनी फोटो ट्विट करून म्हटले की, 'मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सांभाळतात. मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा नष्ट करण्याचे काम शिंदे पिता-पुत्र करत असल्याचे दिसून येत आहे. असे त्यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in