उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडीकडे झेपावले ! मराठवाड्यातील नागरिकांचा जल्लोष

सर्वोच न्यायालयाचे पाणी सोडण्याचे आदेश असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यास चाल ढकल सुरू केली
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडीकडे झेपावले ! मराठवाड्यातील नागरिकांचा जल्लोष

छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार गोदावरीच्या उर्ध्व खोऱ्यातील धरणातील पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे आदेश राज्य सरकार व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ प्रशासनाने दिले असल्याने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान, दारणा धरणातून १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले असल्याने मराठवाड्यातील शेतकरी व उद्योजकांना दिलासा मिळ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यासाठी खोडा घातला होता. गोदावरी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पाण्यावर देखरेख ठेवण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली होती. परंतु नगर व नाशिक जिल्ह्यातील स्वार्थी पुढाऱ्यांनी पाणी सोडण्यास स्थगिती मिळावी यासाठी उब व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिली नाही.

सर्वोच न्यायालयाचे पाणी सोडण्याचे आदेश असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यास चाल ढकल सुरू केली असता, मराठवाड्यातील जनता रस्त्यावर उतरल्यानंतर शासनाचे व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ प्रशासनाचे धाबे दणाणले होते. जायकवाडीत पाणी सोडावे यासाठी माजी मंत्री अनिल पटेल, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह माजी आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी आंदोलन केले. तसेच घनसावंगी चे भाजपचे विधानसभा अध्यक्ष सतीश गाडगे पाटील यांनी पैठण तालुक्यात दचिण जायकवाडी येथे मगर, नाशिक जिल्ह्यतील साखर कारखान्यांना जाणाऱ्या उसाच्या गाड्या अडविल्या होत्या. शेवटी सर्वांनी केलेल्या या आंदोलनाला यश मिळाले असून, शुक्रवारी रात्री अकरा वाजता दारणा धरणातून शंभर क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

पाण्यासाठी पथक नियुक्त

दरम्यान या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये गोदावरी नदीवरील समूहः- विनायक विष्णू पंत नखाते कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.३ बीड, मुळा धरण समूह नदी क्षेत्रः- मयुरा जोशी कार्यकारी अभियंता जायकवाडी *पाटबंधारे विभाग क्र. परभणी, प्रव्ररा धरण समूह नदीक्षेत्रः पि.बी. जाधव कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in