हणबरवाडी-शहापूर योजनेचे पाणी शिवारात लागले खेळू

कराड उत्तरचे आ.पाटील यांच्या प्रयत्नांना आले यश
हणबरवाडी-शहापूर योजनेचे पाणी शिवारात लागले खेळू

कराड : कराड तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील १६ गावांना वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित हणबरवाडी-शहापूर व धनगरवाडी - बानुगडेवाडी उपसा जलसिंचन या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाणी योजना आ बाळासाहेब पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेल्या आहेत.त्यानंतर त्याचे टेस्टिंगही झाले होते,मात्र शासनाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती.शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी स्वतः आ.पाटील यांनी शेतकऱ्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडला होता.अखेर त्यांच्या आंदोलनाला यश येत बुधवारी प्रत्यक्षात या योजनेचे पाणी शिवारात खेळू लागल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

या योजनेच्या लाभक्षेत्रातील १६ गावांतील शेतकऱ्यांसमवेत आ बाळासाहेब पाटील यांनी मसूर येथील मुख्य चौकात गेल्या १८ ऑगस्ट रोजी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून जिल्‍हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरध्वनीवरून चर्चा होऊन २२ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, तसेच दिनांक २१ ऑगस्ट रोजीच्या सातारा येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आ.बाळासाहेब पाटील यांनी मसूरच्या पूर्वेकडील गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्‍याची पालकमंत्री यांना जाणीव करून दिली व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती केली. त्‍यामुळे अखेर बुध . २३ ऑगस्‍ट रोजी हणबरवाडी-शहापूर योजनेला पाणी सोडण्यात आले. या योजनेच्या पाण्याचे १५ दिवस चालू व ८ दिवस बंद असे आवर्तन राहणार आहे.

याप्रसंगी कराड मार्केट कमिटीचे संचालक मानसिंगराव जगदाळे, सह्याद्रीचे संचालक लालासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, डॉ.विजय साळुंखे, शिवाजी साळुंखे, सुनील साळुंखे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रा कादर पिरजादे, रमेश जाधव प्रमोद चव्हाण, विकास पाटोळे सौ.उज्वला साळुंखे, युवराज शिंदे, बापूराव शिंदे, त्रिंबक शिंदे, कैलास शिंदे, संभाजी शिंदे, संभाजी इंगवले, सागर इंगवले, पिंटू पाटील, कन्हेर कालवा उपविभाग क्र.२ चे सहाय्यक अभियंता गणेश इंगोळकर, कन्हेर कालवा विभाग करवडी क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता आर व्ही. घनवट,शाखा अभियंता एस.बी यादव, कृष्णा सिंचन विभाग सातारा चे कार्यकारी अभियंता प्रगती यादव, उपअभियंता मसूर यु. व्ही.नांगरे, उपअभियंता यांत्रिकी विभाग विजय पाटील शाखा अभियंता धुमाळ शेतकरी बांधव ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी मागणी अर्ज भरणे गरजेचे

हणबरवाडी शहापूर योजनेचे पाणी नुकतेच सुरू झाले असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज तातडीने जलसंपदा विभागाच्या मसूर ता.कराड येथील कार्यालयात भरून पाणी योजनेचा लाभ घ्यावा याबाबत शेतकऱ्यांच्या जनजागृती करावी, असे आवाहन आ बाळासाहेब पाटील यांनी करून केवळ २० टक्केच रक्कम शेतकऱ्यांनी भरायचे असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in