नांदेड : १४ महिन्यांनी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणात अखेर लोहा येथील दोन डॉक्टरांवर सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी हनमंता रामकिशन शेट्टे (रा.लोहा) यांच्या पत्नी सुमन यांना लोहा येथील डॉ. संजय नागनाथराव जवळगेकर आणि डॉ. गणेश रुस्तुम चव्हाण यांच्या दवाखान्यात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसुतीनंतर त्यांना रक्तस्त्राव जास्त होत होता आणि तो थांबविण्यात डॉ. जवळगेकर आणि चव्हाण यांना अपयश आले. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी महिलेला नांदेडकडे पाठविले आणि नांदेडला आणल्यानंतर तिचा मृत्यू अगोदरच झाला होता.