बंदाघाटवरून तरूणाचा मोबाईल पळवला

नदी पात्राचे बाजुला व्हीडीओ बनवीत होते
बंदाघाटवरून तरूणाचा मोबाईल पळवला
Published on

नांदेड : बंदा घाट येथे व्हिडिओ बनवत, असताना एका अनोळखी व्यक्तीने तरूणाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. यासंबंधी नांदेड तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी असलेला शुभम प्रकाश घुतमल यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुभम व त्याचा मित्र १२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा दरम्यान, बंदाघाट नदी पात्राचे बाजुला व्हीडीओ बनवीत होते. यातील अनोळखी सरदारजी पिवळ्या रंगाची पगडी असलेल्या आरोपीने यहाँ व्हीडीओ क्यूँ बना रहे असे म्हणुन शुभम जवळील नामांकित कंपणीचा ६० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेला. या प्रकरणी शुभम घुतमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in